Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil | डमी उमेदवार असल्यानेच मुख्यमंत्री आले नाहीत, अमोल कोल्हे यांनी डिवचले, आढळरावांनी दिले प्रत्युत्तर, ”मी डॅडी उमेदवार…”

0

पुणे : Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil | आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत, म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी केली. या टीकेला आढळरावांनी, मी डमी नव्हे डॅडी उमेदवार, असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. या दोन उमेदवारांमध्ये सध्या जोरदार खडजंगी सुरू असल्याचे दिसत आहे. (Shirur Lok Sabha)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) तिकीट देणार होते. त्यामुळे आढळराव पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली होती. यानंतर पुन्हा एकदा कोल्हे यांनी आढळरावांना डिवचले आहे.

आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले. त्यावरून डॉ. कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर पुन्हा निशाणा साधला. अमोल कोल्हे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आलेच नाहीत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, मी काय सभा घेणार नाही. मी फक्त रोड शो करून जाईन, यावरूनच स्पष्ट होते की आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत.

अमोल कोल्हे यांनी केलेल्या या टीकेला प्रत्युत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, मी डमी नाही तर मी डॅडी उमेदवार आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी समजून घ्यावे की डमी ते असतील आणि डॅडी मी आहे. साधारण पाहता अमोल कोल्हेंनी शिरुर मतदार संघातील अनेक गावें दत्तक घेतली आहेत. या दत्तक घेतलेल्या गावात सोयी सुविधा नाहीत.

मात्र मी कोणालाही न सांगता माझ्या संस्थेमार्फत अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा करतो. गावात सोयी सुविधा देतो. गावे नुसते दत्तक घेऊन होत नाही सोयी सुविधादेखील पुरवाव्या लागतात. त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातदेखील मी पाणी पुरवठा करत आहे, अशी टीका आढळराव पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.