Sadabhau Khot On Sharad Pawar | ”म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय, दादा किल्ली बघून-बघून म्हातारं झालं”, सदाभाऊ खोतांची फटकेबाजी

0

सोलापूर : Sadabhau Khot On Sharad Pawar | मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हातात प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हा म्हातारा लय खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतोय. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले, अशी जोरदार फटकेबाजी करत सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार रणजीतसिंह निंबाळकरांच्या (Ranjeetsingh Naik Nimbalkar) प्रचारसभेत ते बोलत होते.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, मग अजित पवारांच्या लक्षात आले की, हे म्हातारं कंबरेची किल्ली काढत नाही म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही कधी म्हातारं झाल्यावर प्रपंच करायचा का? म्हणून दादा विकासासाठी महायुतीमध्ये आले.

सदाभाऊ खोत म्हणाले, या मतदारसंघात शरद पवारांविषयी अनेक गोष्टी ऐकायला येतील. साहेबांचे वय ८४ म्हणून ते ८४ सभा घेणार अशा चर्चा आहेत. पण तुम्हीच सांगा, सध्या साहेबांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत का? की जनावरांना पाणी पाजायचंय? सध्या त्यांचा धंदाच हा आहे. या वयात देखील आमच्या सारख्यांना संधी दिली जात नाही.

दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवारांवर वयावरून टीका केली तेव्हा पवारांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. आता सदाभाऊ खोतांना पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.