Manoj Jarange Patil | जरांगेंनी अ‍ॅम्ब्युलन्समधून येऊन केलं मतदान, समाजाला केलं आवाहन, ”मराठा विरोधकांना या निवडणुकीत पाडा” (Video)

0

जालना : Manoj Jarange Patil | आपला उमेदवार नसल्यामुळे, तुम्ही मतदान कोणालाही करा, पण जे सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत त्याला करा. इतक्या ताकदीने विरोधकाला पाडा की त्याच्या कमीत कमी पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या नाही राहिल्या पाहिजेत. मराठ्यांनी एकजूट दाखवा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज जालना येथे केले.

मनोज जरांगे यांनी लोकसभेसाठी जालना जिल्ह्यातील (Jalna Lok Sabha) अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. प्रकृती अस्वास्थामुळे ते अ‍ॅम्ब्युलन्समधून आले होते.

मनोज जरांगे यावेळी म्हणाले, मी सांगितलं होतं कुणालाही मतदान करा, समाजाच्या खांद्यावर जबाबदारी आहे. सगेसोयरेच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजाने करावं. आपण उमेदवार दिलेला नाही, पाठिंबाही दिला नाही. पण पाडण्यातही आपला विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. पाडण्यातही खूप मोठा विजय आहे.

विधानसभा लढवण्याचे सूतोवाच करताना मनोज जरांगे म्हणाले, जर सहा जूनच्या आत आरक्षण दिलं नाही तर देणारे बनू, आपण विधानसभेला मैदानात मी सुद्धा असेन. कारण मराठा, मुस्लिम, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. बारा बलुतेदार दलित बांधव सगळ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण देणारे बनू.

उगाच काहीही अफवा पसरवल्या जात आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी दोघे सारखेच आहेत हे म्हणण्याचा माझा अर्थ होता, या दोघांनी मिळून आमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, दोघांनी लेकरांचं वाटोळं केलं, असा खुलासा जरांगे यांनी केला.

मनोज जरांगे म्हणाले, २८८ पैकी ९२-९३ मतदारसंघात मराठ्यांचं वर्चस्व आहे. माझा राजकीय मार्ग नाही, मला तिकडे जायचं नाही, पण मला तुम्ही तिकडे न्यायचा प्रयत्न करताय तर माझा नाईलाज आहे. मराठा समाजासह लिंगायत समाज सर्व एकत्र येऊ. प्रश्न गोरगरिबांचा आहे, आम्हाला देणारे बनावे लागेल, असा इशारा जरांगे यांनी आरक्षण विरोधकांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.