Pune Crime | भाडेकरु तरुणाने केला घर मालकिणीवर बलात्कार, आरोपी तरुणावर FIR

0

पिंपरी :  एन पी न्यूज 24  – Pune Crime | मानलेल्या भावाला (Supposed Brother) घराच्या टेरेसवरील खोलीत भाड्याने राहू दिले. त्यानंतर मानलेल्या भावाने महिलेसोबत काढलेले फोटो पतीला दाखवण्याची धमकी (Threat) देऊन बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली आहे. ही घटना चिखली पोलीस ठाण्याच्या (Chikhali Police Station) हद्दीत 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास (Pune Crime) घडली आहे.

याबाबत रामहरी वगरे (वय-31 रा. असंगी, ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 31 वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी महिलेच्या माहेरचा असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख आहे. फिर्यादी या आरोपीला भाऊ मानत असल्याने त्यांनी घराच्या टेरेसवर (Terrace) असलेली खोली आरोपीला भाड्याने राहण्यास दिली. (Pune Crime)

फिर्यादी कामानिमित्त टेरेसवर गेल्या असता आरोपीने त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्यासोबत मोबाईलमध्ये फोटो (Photo) काढले. घटनेच्या दिवशी फिर्यादी टेरेसवरील पाण्याच्या टाकीचा कॉक सुरु करण्यासाठी गेल्या असता त्या एकट्या असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने त्यांना खोलीत ओढत नेले.
खोलीचा दरवाजा बंद करुन फिर्यादी यांना ‘तुझे व माझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल आणि
तुझा नवरा काही बोललाच तर त्याला इथेच मारून टाकीन. मी सांगेन तसं कर’
असे म्हणून धमकवून फिर्यादी यांच्यावर अत्याचार केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद (API Tawfiq Sayyed) करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | Tenant youth rapes house owner woman accused youth gets FIR

Indian Railway New Guidelines | प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘इथं’ रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी नवीन गाइडलाइन जरूर वाचा

Solapur Crime | पोलीस निरीक्षकावर पुण्यानंतर सोलापूरमध्ये विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल

Pune Crime | शास्त्री रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ

Railway Protection Force (RPF) | रेल्वे सुरक्षा दलात (RPF) भरतीची जाहिरात बोगस, विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बरोबरीने सेवालाभांचा दावा करू शकत नाहीत ‘हे’ कर्मचारी – कोर्ट

Leave A Reply

Your email address will not be published.