Kidnapping-Rape Case Pune | पुणे : अल्पवयीन मुलीचे अपहरण अन् बलात्कार, दोघांना अटक

0

पुणे : – Kidnapping-Rape Case Pune | चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure Of Marriage), भुलवून, तिचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे (Minor Girl Rape Case). भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) अपहरण झालेल्या मुलीला ताब्यात घेतले असून तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ही मुलगी बेपत्ता झाली होती. आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी त्या मुलीचा शोध लावला आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला व त्याला मदत करणाऱ्यास अटक केली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन वैभव शिवराम मेरगो
Vaibhav Shivram Mergo (वय-32 रा. कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर), प्रशांत पांडुरंग बनसोडे Prashant Pandurang Bansode (वय-40 रा. टेंभुर्णी ता. माढा, सोलापूर), सुमित वाल्मीकी (वय-25 रा. सोलापूर) यांच्यावर आयपीसी 363, 366, 376, 376/2/एन/आय, 323, 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन वैभव मोरगो व प्रशांत बनसोडे यांना अटक केली आहे. तर सुमित वाल्मीकी हा फरार असून पोलीस त्याचा ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव मोरगो याचा चॉकलेट एजन्सी आहे. तर प्रशांत बनसोडे याचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. वैभव मेरगो याने फिर्यादी यांच्या 14 वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून 18 सप्टेंबर 2022 रोजी पळवून नेले. आरोपीने सुमित वाल्मीकी व प्रशांत बनसोडे यांच्या मदतीने मुलीला पळवून नेले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला लग्नचे आमिष दाखवून तिच्यावर टेंभुर्णी येथे शारीरिक संबंध ठेवले. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे प्रशांत बनसोडे याच्या घरी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

आरोपीने शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आई व भावाचे अपरहण करुन त्यांना मारु टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन तिची सुटका करुन दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिठारे (PSI Sonali Mithare) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.