Pune Corona Updates | पुणेकरांची चिंता कायम ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3 हजारांहून अधिक रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

0

पुणे :  एन पी न्यूज 24  – पुणे शहरामध्ये कोरोना (Pune Corona Updates) संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. काल पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. यामध्ये आज थोडी घट झाली आहे. आज शहरामध्ये 3 हजाराच्या 67 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रीय रुग्णांची वाढली आहे.

शहरात आजपर्यंत 5 लाख 29 हजार 102 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. आज शहरात 857 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 5 लाख 02 हजार 875 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण शहरातील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 129 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 17 हजार 098 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 143 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
तर 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 15,139 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 39 लाख 92 हजार 520 तपासणी करण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- Pune Corona Updates | Pune residents’ worries remain! In the last 24 hours in the city of Pune, more than 3,000 patients were diagnosed with Corona, find out other statistics

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Related Posts

Almonds Side Effects | आरोग्यासाठी लाभदायक आहेत बदाम, परंतु…

<