PNB | ‘या’ बँकेच्या खात्यामध्ये ठेवावे लागणार किमान 10 हजार; नाहीतर ग्राहकास 600 रुपये दंड, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PNB | भारतातील दुस-या क्रमांकाची सगळ्यात मोठी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आहे. मात्र PNB बँकेने आपल्या सगळ्या सेवेचे शुल्क वाढविले असल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार आता पीएनबीच्या शहरातील शाखेत खाते असल्यास या खात्यावर कमीतकमी दहा हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत. दरम्यान, PNB च्या या नव्या नियमावलीमुळे इतर बँकांवरही याचा परिणाम होणार असल्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक बँकिंग सेवांचा (Banking Services) फटका सर्वसामान्यांना होणार आहे.
नवीन शुल्क 15 जानेवारीपासून लागू होणार आहे. खात्यात किमान शिल्लक मर्यादा आधी पाच हजार रुपये होती. आता किमान दहा हजार रुपये खात्यावर ठेवावे लागतील. खात्यात 10 हजारांपेक्षा कमी रक्कम राहिल्यास ग्राहकास 600 रुपये दंड सोसावा लागणार आहे. दंडाची ही रक्कम आधी 300 रुपये होती. आता 600 रुपये करण्यात आली आहे. अशी पंजाब नॅशनल बँकेच्या संकेतस्थळावर सेवा शुल्काच्या वाढीची माहिती दिली गेली आहे.
पीएनबीच्या ग्रामीण भागातील शाखांसाठी किमान शिल्लक मर्यादा एक हजार रुपये कायम ठेवण्यात आली आहे.
इतकी रक्कम खात्यावर नसल्यास आता 400 रुपये दंड भरावा लागेल.
यापुर्वी दंडाची रक्कम 200 रुपये होती. आता 400 करण्यात आली आहे.
तर, पीएनबीने आपल्या लॉकर शुल्कात 500 रुपये पर्यंत वाढ केलीय.
छोट्या लॉकरचे शुल्क ग्रामीण भागासाठी 1 हजार रुपयांवरून 1250 रुपये, तर शहरी भागासाठी दीड हजार रुपयांवरून 2 हजार रुपये केले आहे.
दरम्यान, सगळ्यात मोठ्या आकाराच्या लॉकरचे शुल्क शहरी आणि ग्रामीण भागात 10 हजार रुपये कायम ठेवण्यात आलीय.
दरम्यान, समजा एखाद्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे नसल्यास आणि हप्ता चुकला तर लागणारा दंड शंभर रुपयांवरून 250 रुपये केला आहे. डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) रद्द करण्यासाठीचे शुल्क 100 रुपयांवरून 150 रुपये केले आहे. चेक परत आल्यास एक लाखांपर्यंतच्या रकमेवर लागणारे शुल्क 100 रुपयांवरून 150 रुपये, तर एका लाख रकमेवरील शुल्क 200 रुपयांवरून 250 रुपये केले गेले आहे.
ग्राहकांना बसणार फटका –
– दहा हजारांपेक्षा कमी रक्कम राहिल्यास ग्राहकास 600 रुपये दंड असणार.
– छोट्या लॉकरचे शुल्क दीड हजार रुपयांवरून 2 हजार रुपये खात्यात पैसे नसल्यामुळे हप्ता चुकल्यास दंड.
– 250 रुपये केवळ 3 वेळा पैसे जमा करता येणार, त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 50 रुपये शुल्क लागणार.
Web Title :- PNB | now you have keep least 10 thousand bank account otherwise customer will be fined rs 600
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update