Maharashtra Weather | उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तर विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले; नाशिक, निफाडमध्ये हंगामातील निचांकी किमान तापमानाची नोंद

0

पुणे :  एन पी न्यूज 24 –  Maharashtra Weather | उत्तरेकडून आलेले थंड वारे आणि त्याचवेळी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा संगम झाल्याने एकाचवेळी उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) थंडीची लाट (Cold Wave) तर, विदर्भासह (vidarbha) मराठवाड्यात (Marathwada) अवकाळी पाऊस (Untimely Rains In Maharashtra) असे चित्र राज्यात दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाबरोबरच थंडगार वारे यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर या परिसरात अवकाळी पावसाने झोडपले. संपूर्ण विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. (Maharashtra Weather)

उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान ६.१ अंश सेल्सिअस सोमवारी सकाळी नोंदविले गेले आहे. त्याचवेळी नाशिकमध्ये ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घसरण झाली आहे. (Maharashtra Weather)

पुण्यातही रविवारी रात्रीपासून थंडीचा कडाका वाढल्याचे (Pune Weather) जाणवत होते. या हंगामात दुसर्‍यांदा जिल्ह्यातील किमान तापमान सिंगल डिजिट झाले आहे. पुण्यातील माळीण येथे सोमवारी सकाळी ८.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

 

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे शिवाजीनगर ११.६, मुंबई १५.२, रत्नागिरी १९.१, डहाणु १५.५, उस्मानाबाद १६.४, परभणी १६, अहमदनगर १२.४, जळगाव ९, कोल्हापूर १६.९, महाबळेश्वर १०.४, सांगली १५.९, सातारा १५, सोलापूर १६.७, अकोला १५.५, बुलठाणा १२.६, ब्रम्हपूरी १७.५, नागपूर १८.३, वाशिम १२, यवतमाळ १६, गोंदिया १६.८.

Web Title :- Maharashtra Weather | Cold wave in North Maharashtra and unseasonal rains in Vidarbha; Seasonal minimum temperature recorded in Niphad, Nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

SSY | ‘या’ सरकारी योजनेत अवघ्या 400 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवू शकता जवळपास 65 लाखाची रक्कम, जाणून घ्या नियम आणि अटी

Earn Money | सुरू करा सोपे काम, दर महिना होईल 39 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत, जाणून घ्या सोपी पद्धत

PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महापालिकेत मेगा भरती ! 4292 पदांची होणार भरती; जाणून घ्या

Post Office Schemes | हवा असेल वर्षाला चांगला रिटर्न तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळतात अनेक फायदे

Vote From Home | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता घरूनच करता येणार मतदान; जाणून घ्या प्रक्रिया अन् कोणासाठी आहे ही सुविधा

Corona Vaccine Booster Dose | आजपासून ‘या’ लोकांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस; जाणून घ्या प्रक्रिया

Leave A Reply

Your email address will not be published.