PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महापालिकेत मेगा भरती ! 4292 पदांची होणार भरती; जाणून घ्या

0

पिंपरी : एन पी न्यूज 24  – PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महापालिकेत (Pimpri-Chinchwad Corporation) मेगा भरती होणार आहे. महापालिकेच्या ‘ब’ वर्गात (‘B’ Category) समावेश झाला आहे. महापालिकेचा नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला असून राज्य सरकारने (Maharashtra Government) अस्थापनेवरील सरळ सेवेने (Direct Service) वेगवेगळी पदं भरण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने महापालिका अस्थापनेवरील (Establishments) पदे भरण्यास परवानगी दिल्याने 4292 पदांची भरती (PCMC Recruitment 2022) केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया महापालिका स्वत: राबविणार आहे.

पालिका आस्तापनेवरील नोकरभरती करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. 14 डिसेंबरला महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च 35 टक्के मर्यादेच्या आत राहील याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना नगरविकास विभागाने महापालिकेला दिली आहे. त्यामुळे महापालिका लवकरच नोकर भरती (PCMC Recruitment 2022) करणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन विभागाने तयारी सुरु केली आहे.

खासगी संस्थेच्या माध्यमातून भरती करत असताना अनेक गैरप्रकार घडत आहेत. यामुळे महापालिकेने ही भरती प्रक्रिया स्वत: राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका प्रशासनाचे उपायुक्त सुभाष इंगळे (Deputy Commissioner Subhash Ingle) यांनी दिली. महापालिकेकडून वैद्यकीय (Medical), आरोग्य (Health), विद्युत (Electricity), पाणीपुरवठा (Water Supply) या अत्यावश्यक विभागातील पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये लिपिक (Clerks), प्रशासन अधिकारी (Administration Officers), अभियंता (Engineers) आणि अन्य आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.

 

Web Title :-  PCMC Recruitment 2022 | PCMC recruitment of 4292 posts in pimpri chinchwad municipal corporation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Post Office Schemes | हवा असेल वर्षाला चांगला रिटर्न तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळतात अनेक फायदे

Vote From Home | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता घरूनच करता येणार मतदान; जाणून घ्या प्रक्रिया अन् कोणासाठी आहे ही सुविधा

Corona Vaccine Booster Dose | आजपासून ‘या’ लोकांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस; जाणून घ्या प्रक्रिया

KVP Interest Rate Change | ‘किसान विकास पत्र’चे (KVP) नवीन व्याजदर घोषित, जाणून घ्या आता किती आहे नवीन व्याजदर

Coronavirus Maharashtra Police | राज्यातील 1 हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण; काही IPS सह 316 अधिकार्‍यांना संसर्ग, 24 तासात 276 पोलिसांना लागण

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट आजचे दर

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली’ – अमोल मिटकरी

Leave A Reply

Your email address will not be published.