वेळ जातोय तसा लँडर ‘विक्रम’सोबत संपर्क करणं अवघड ! शास्त्रज्ञांची चिंता वाढली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्रयान 2 चा लँडर विक्रमसोबत पुन्हा संपर्क साधण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. रविवारी ऑर्बिटरने लँडर विक्रमचे लोकेशन शोधले होते. यानंतर लँडर विक्रमसोबत संपर्क होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अर्थात शास्त्रज्ञांसाठी हे सोप नाही. वेळ जात आहे तसा लँडर विक्रमसोबत संपर्क ढील्ला होतो आहे. इस्रो प्रमुख के सिवन यांनी शनिवारी म्हटलं आहे की, अंतराळ संस्था 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल.

90 ते 95 टक्के मोहिम यशस्वी

इंस्टिट्युट ऑफ डिफेंस स्टडीज अँड अ‍ॅनालिसिसचे वरिष्ठ संशोधक अजय लेले म्हणाले की, “लँडर विक्रमविषयी ऑर्बिटरने ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यावरून स्पष्ट होतं की, ऑर्बिटर एकदम योग्य पद्धतीने काम करत आहे. ऑर्बिटर मोहिमेचा मुख्य भाग होता. कारण याला एका वर्षाहून अधिक काळ काम करायचं आहे. ऑर्बिटरच्या योग्य पद्धतीने काम करण्याने या मोहिमेचे 90 ते 95 टक्के ध्येय गाठले जाणार आहे.”

डेटावरून माहिती केली जाईल लँडरची स्थिती

चंद्रयान 2 च्या ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष आहे. यावेळी चंद्राभोवती फेऱ्या मारत प्रत्येक माहिती पृथ्वीवरील इस्रोमधील शास्त्राज्ञांना तो देत राहिल. तर रोवर प्रज्ञानचे आयुष्य एक चंद्र दिवस म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवसांइतके आहे. इस्रोचे माजी वैज्ञानिक एस नांबी नारायण म्हणाले की, “पुढील आव्हान हे लँडरसोबत संपर्क करण्याचे आहे. पुन्हा संपर्क होण्याची शक्यता खूप कमी आहे. होऊ शकतं की, लँडरने क्रॅश लँडिंग केली असावी.”

आरोग्यविषयक वृत्त