‘या’ कारणावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांचा पासपोर्ट जप्त

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा पासपोर्ट मुंबई प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने जप्त केला आहे. मेधा पाटकर यांच्याविरोधात मध्यप्रदेश येथे सामाजिक आंदोलनादरम्यान ९ गुन्हे दाखल झाले होते. याची माहिती त्यांनी पासपोर्ट कार्यालयाला दिली नसल्याचे सांगत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पाटकर यांनी यासाठी वेळ मागितला असतानाच पासपोर्ट जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

मार्च २०१७ मध्ये मेधा पाटकर यांना दहा वर्षे मुदत असलेला पासपोर्ट जारी करण्यात आला होता. मध्य प्रदेशातील बडवानी येथील ३, अलीराजपूरमधील १ आणि खंडवा जिल्ह्यातील ५ अशा ९ दाखल गुन्ह्यांची माहिती लपविण्याचा ठपका ठेवत मुंबईच्या पासपोर्ट कार्यालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीशीला प्रतिसाद म्हणून मेधा पाटकर यांनी कार्यलयाकडे वेळ मागितला होता. कोर्ट, पोलिसांकडून कागदपत्रे घेण्यास वेळ लागेल असे त्यांचे म्हणणे होते. त्यांची ही विनंती आठवडाभरापूर्वी फेटाळण्यात आली होती. तसेच पासपोर्ट जमा करण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला होता. यानंतर आता त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.