जीओफोन ग्राहकांना झटका ! कंपनीने बंद केला ‘हा’ सर्वात स्वस्त प्लॅन

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जीओफोन ग्राहाकांना आता ४९ रूपयांचा प्लॅन मिळणार नाही. कारण कंपनीने हा प्लॅन बंद केला असून त्याऐवजी ७५ रूपये दर्शनी किमतीचा प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. ६ डिसेंबररोजी रिलायन्स जीओने आपल्या टेरिफ प्लॅनमध्ये बदल केले होते. मात्र, त्यावेळी प्लॅनची किंमत वाढवली नव्हती. परंतु, आता कंपनीने दरवाढ केली असून सर्वात स्वस्त ४९ रूपयांचा प्लॅन बंद केला आहे.

जीओचे प्लॅन आता ७५ रुपयांपासून सुरू होत आहेत. काही आठवड्यांपूर्वी जीओने जीओफोन युजर्ससाठी नवीन ऑल इन वन प्लॅन सादर केला होता. सध्याचा ७५ रुपयांचा प्लॅन त्यामधीलच एक आहे. जीओफोन ग्राहकांना रिचार्जसाठी आता ९९ रुपये, १५३ रुपये, २९७ रुपये और ५९४ रुपयांचे प्लॅन सुद्धा उपलब्ध आहेत. परंतु, ग्राहकांना नॉन जीओ वापरासाठी आययुसी टॉपअप रिचार्ज करावे लागणार आहे.

रिलायन्सने जीओफोनची किंमत १५०० रूपये ठेवून लाखो लोकांना आकर्षित केले होते. या सर्वसामान्यांना ग्राहकांना ४९ रूपयांचा प्लॅन परवडणारा होता. या प्लॅनमध्ये जीओद्वारे बिना एफयूपी लिमिट, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि २८ दिवसांच्या मुदतीसाठी १ जीबी डेटा दिला जात होता. सध्या आययुसी टॉपअप व्हाउचर आल्यानंतर ४९ रूपयांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना आययुसी टॉपआप रिचार्ज खरेदी करावे लागत होते. आता तर हा प्लॅनच कंपनीने बंद केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.