सावधान ! चप्पल घालून वाहन चालवल्यास भरावा लागेल ‘दंड’, ‘हा’ आहे नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात 1 सप्टेंबर 2019 पासून नवीन मोटर व्हिकल अ‍ॅक्ट लागू करण्यात आला आहे. यानंतर आता देशभरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला दंड म्हणून मोठी रक्कम अदा करावी लागणार आहे. यानंतर आता विना परवाना वाहन चालवण्यास 5000 रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. हे वाचून तुम्हाला आश्रचर्य वाटले की, जर तुम्ही चप्पल घालून वाहन चालवाल तर हाही अपराधच आहे?

या नियमाचं आताही कठोरपणे पालन केलं जात आहे. वाहतूक नियमांनुसार चप्पल किंवा  सँडल घालून दुचाकी चालवण्यास चालकाला दंड भरावा लागू शकतो. हा नियम चालकाची सुरक्षा लक्षात घेऊन बनवला आहे. नियमानुसार, स्लीपर किंवा चप्पल घालून दुचाकी चालवण्यास परवानगी नाही. कारण विभागाचं असं म्हणणं आहे की, यामुळे अपघाताची शक्यता वाढते.

दुसऱ्यांदा पकडल्यानंतर होऊ शकते 15 दिवसांची जेल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर किंवा चप्पल घालून दुचाकी चालवल्यास पकडल्यानंतर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. सोबतच तुम्ही जर पुन्हा  एकदा चप्पल घालून बाईक चालवताना पकडले गेलात तर तुम्हाला 15 दिवसांची जेलही होऊ शकते. नवीन वाहतूक कायदा लागू झाल्यानंतर काही भागात चालकाच्या चप्पल घालून दुचाकी चालवल्यानेही दंड आकारला गेला आहे.

10 पटीने दंडात वाढ

नवीन वाहतूक नियम लागू झाल्यानंतर आकारला जाणारा दंड 10 पटीने वाढवण्यात आला आहे. मद्य पिऊन वाहन चालवल्यास गुन्ह्यासाठी 6 महिन्यांची जेल आणि 10000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जर पुन्हा ही चूक केली तर 2 वर्षांपर्यंत जेल आणि 15000 रुपये दंडाची तरतूद आहे. जर एखादा अल्पवयीन वाहन चालवत असेल तर त्याला 10000 रुपये दंड द्यावा लागेल. याआधी हा दंड 500 रुपये होता.  त्याचबरोबर ओव्हरस्पीडवरील दंड 400 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. डेंजरस ड्रायव्हींग केल्यावर दंड 1000 रुपयांवरून वाढवून 5000 रुपये करण्यात आला आहे. गाडी चालवताना रेस लावल्यास दंड 500 रुपयांवरून वाढवून 5000 रुपये करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त