राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला ; ‘यांच्या’ उपस्थित करणार प्रवेश

ganesh-naik
9th September 2019

मुंबई : एनपीन्यूज24 ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसची गळती सुरु असून मुंबईमधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. गणेश नाईक येत्या 11 सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.

गणेश नाईक यांच्यासह नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 55 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोकण आयुक्तांची भेट घेत सोमवारी वेगळा गट स्थापन करण्याबाबत तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार आहेत. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये भाजप प्रवेशाचा सोहळा होणार असल्याची माहिती आहे.

गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी आधीच कमळ हाती घेत भाजपचा रस्ता धरला आहे. संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या 22 आणि अपक्ष 4 नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आता राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची अस्तित्वाची लढाई सुरु आहे.