दोन तोंडाचा साप पाहून घाबरले लोक! चमत्कार म्हणून पाजू लागले दूध

मिदनापूर : एन पी न्यूज 24 – तुम्ही साप तर अनेक पाहिले असतील, पण दोन तोंडाचा साप कधी पाहिला आहे का ? तुम्ही विचार करत असाल की खरच दोन तोंडाचा साप असतो का, पण या प्रश्नाचे उत्तर होय, असेच आहे. पश्चिम बंगालच्या मिदनापुर येथील गावात एका दुर्मिळ प्रजातीचा दोन तोंडाचा साप आढळला आहे. हे दृश्य पाहणारे ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत.

दोन तोंडाचा हा साप बेल्दा जंगल परिसारात आढळला असून तो नाजा कौठीया प्रजातीचा असल्याचे सांगितले जात आहे. या सापाला पाहण्यासाठी दूरदूरचे लोक या गावात येत असून श्रद्धेने त्यास दूध पाजत आहेत.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार नाजा कौठीया प्रजातीचा हा साप अतिशय धोकादायक आणि विषारी असतो. लोकांना यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. सध्या हा दोन तोंडाचा साप वन विभागाच्या ताब्यात आहे.

अशाच प्रकारचा साप सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये सापडला होता. यास रॅटल स्नेक म्हटले जाते. या सापाची पहिली नावे आणि दोन तोंडामुळे पशुतज्ज्ञांनी त्यास डबल डेव असे नाव दिले आहे.

या दोन तोंडाच्या सापाला दोन पूर्ण डोकी, चार डोळे आणि दोन जीभ असून शरीरमात्र एकच आहे. तज्ज्ञ सांगतात की, दोन तोंडाचे साप जंगलात जास्त जीवंत राहू शकत नाहीत. कारण त्यांची पळण्याची गती कमी असल्याने दुसरे प्राणी त्यांची शिकार करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.