Murlidhar Mohol | कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीला मोठा प्रतिसाद

0

पुणे : – Murlidhar Mohol | कसबा (Kasba Vidhan Sabha) आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात (Parvati Vidhan Sabha) काढण्यात आलेल्या रॅलीला भाजप महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांना मोठा प्रतिसाद मिळाला. दत्तवाडीतल्या (Dattawadi) श्री म्हसोबा देवस्थान येथे दर्शन घेत म्हसोबा चौकातून या रॅलीला प्रारंभ झाला. बाईक रॅलीमध्ये तरुणांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत मोठी रॅली काढली

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, बाईक रॅलीच्या (Murlidhar Mohol Bike Rally) मदतीने तरुणांनी सध्या सारे शहर ढवळून काढले आहे. तरुणांची रॅली असली, तरीही अतिशय शिस्तबद्ध आणि मतदारांची काळजी घेत तिचे मार्गक्रमण सुरू आहे. कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील बाईक रॅलीला तर तुफान प्रतिसाद मिळाला. अनेक मतदार जवळ येऊन भेटत होते. भगिनींची औक्षणासाठी होणारी गर्दी आणि मतदारांच्या हस्तांदोलनातही खूप आपुलकी होती.

दत्तवाडीतल्या श्री म्हसोबा देवस्थान येथे दर्शन घेत म्हसोबा चौकातून प्रारंभ झालेली ही रॅली सर्वांचे अभिवादन स्विकारीत शनिमंदिर चौकातून पुढे गेली. सेनादत्त मंदिर, पूना हॉस्पिटल चौक, न्यू इंग्लिश स्कूल चौक, टिळक रोड, दांडेकर पूल, साने गुरूजीनगर, निलायम पूल, पर्वती गाव, पर्वती पोलिस स्टेशन, सातारा रोड, पर्वती दर्शन कमान मार्ग पूरग्रस्त चाळींना भेटी देऊन जवळपास अर्धा विधानसभा मतदारसंघ फिरून या रॅलीचा भाजप संपर्क कार्यालयात समारोप झाला.

या रॅलीत शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह महायुतीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.