Dheeraj Ghate | टिपू सुलतानचे स्मारक होवू देणार नाही; भाजप शहाराध्यक्ष धीरज घाटे

0

पुणे : Dheeraj Ghate | लोकसभा निवडणुकीत (Pune Lok Sabha Election 2024) एमआयएमचे उमेदवार (MIM Candidate) अनिस सुंडके (Anis Sundke) यांनी टिपू सुलतान (Tipu Sultan) यांचे स्मारक पुण्यात उभे करु अशी घोषणा केली आहे. पुण्याच्या भूमित कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मारक होवू देणार नाही. याविरोधात पोलिस तक्रार करणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale), पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, दत्ता खाडे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), सह प्रसिध्दीप्रमुख पुष्कर तुळजापुकर (Puushkar Tuljapurkar) आदी उपस्थित होते.

यावेळी घाटे म्हणाले, एमआयएमचे उमेदवार सुंडके यांनी टिपू सुलतान यांचे स्मारक करण्याच्या घोषणेला भाजपचा तीव्र विरोध आहे. हिंदू समाजावर त्यानी अन्याय केला. देशामध्ये निवडणूका सुरु असताना अशा प्रकारे स्मारकाचा मुद्दा उपस्थित करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुंडके करत आहेत. काही लोकांना टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपने तीव्र विरोध केला होता. त्यामुुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा स्मारकाला विरोध असल्याचे घाटे म्हणाले.

पुणे शहराची ओळख सांस्कृतिक केंद्र म्हणून आहे. अनेक महापुरुषांचे पुणे आहे. टिपू सुलतान हा काही महापुरुष नव्हता, हजारो निरपराध हिंदू पुरुष आणि महिलांचे त्याने बळी घेतले. हिंदुत्ववादी संघटना हे कदापी होवू देणार नाही. यासाठी आम्ही पोलिसात जावू. मते मिळवण्यासाठी अशा प्रकारे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आहे. भाजप याचा तीव्र निषेध करत असल्याचे घाटे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.