Murlidhar Mohol | कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘मोदी… मोदी…’ जयघोष !!!

0

पुणे : – Murlidhar Mohol | महायुतीचे (Mahayuti Candidate) पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात (Pune Cantonment Vidhan Sabha) रॅली काढण्यात आली. प्रचारादरम्यान काढलेल्या या बाइक रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रॅलीत मतदारांनी मोदीऽऽऽ…मोदीऽऽऽ… या घोषणेचा जयघोष केला.

(Ghorpadi) येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज मंदिर येथून रॅलीचा प्रारंभ झाला (Murlidhar Mohol Bike Rally). प्रारंभापासून मतदारांनी दिलेला मोठा प्रतिसाद आणि ठिकठिकाणी झालेले मनापासूनचे स्वागत या रॅलीच्या यशस्वीतेची पावती देणारे होते. शिवाय कार्यकर्त्यांमध्ये संचारलेला उत्साहही वाखाणण्याजोगा होता, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

या रॅली दरम्यान भेटलेल्या साऱ्यांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन केले. त्याला सर्वांनी अतिशय उत्साही प्रतिसादात दिला.

या रॅलीत कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble), मा. आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik), मनसेचे नेते बाबू वागस्कर (Rajendra Babu Wagaskar) यांच्यासह महायुतीचे नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या जोषात सहभागी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.