Fire At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवरील डब्याला मध्यरात्री आग; यार्डातील डबा जळून खाक, जीवित हानी नाही (Video)

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Fire At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवरील यार्डात उभ्या असलेल्या तीन डब्यांपैकी मधल्या डब्याला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत रेल्वे डबा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात ही आग विझविली.

पुणे रेल्वे स्टेशन येथील क्वीन गार्डनच्या मागील बाजूला असलेल्या जंक्शन येथे रेल्वेचे तीन डबे उभे होते. मध्यरात्री १ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास यातील मधल्या डब्याला अचानक आग लागली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाने तातडीने नायडु, येरवडा, बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वॉटर टँकर अशी चार वाहने घटनास्थळी पोहली. हे डबे बर्‍याच दिवसांपासून उभे होते. रेल्वेच्या तीन डब्ब्यापैंकी मधल्या एका डब्ब्याला आग लागल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर लगेचच विद्युत विभागाशी संपर्क साधत विद्युत प्रवाह बंद करण्याच्या सूचना देत जवानांनी लगेच पाण्याचा मारा सुरू केला. आतमध्ये कोणी प्रवासी अथवा रेल्वे कर्मचारी नसल्याची खाञी केली व सुमारे अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवत पुढे कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवत रेल्वे कर्मचारी यांच्या मदतीने इतर दोन डबे सुरक्षित ठिकाणी नेत धोका दूर केला. त्यानंतर आगीवर सतत पाण्याचा मारा सुरू ठेवत आग पूर्ण विझवली.

दलाची मदत पोहोचण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी यांनी उपलब्ध असणार्‍या छोट्या नळीच्या साह्याने पाणी मारत आग विझवण्याचे प्रयत्न केले. घटनास्थळी रेल्वे पोलिस विभागाची मदत उपस्थित होती. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. या घटनेत कोणी जखमी वा जिवितहानी नसून जळालेल्या एका डब्ब्याचे पुर्ण नुकसान झाले आहे. यावेळी अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे व सुमारे वीस जवानांनी आग विझवण्यात सहभाग घेतला.

TET Exam Scam | टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने न्यायालयाने केले परत
Pune Lashkar Crime | झोमॅटो डिलीव्हरी बॉयला मारहाण करणार्‍यांना लष्कर पोलिसांकडून 8 तासाच्या आत अटक
Pune Sahakar Nagar Police | झोमॅटोची डिलीव्हरी करणार्‍या पिता-पुत्रास लुटणार्‍या तिघांना सहकारनगर पोलिसांकडून अटक (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.