Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीच्या मुंबईतील कोणत्याही सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसत नाहीत : प्रकाश आंबेडकर

0

मुंबई : Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT) महाविकास आघाडीसोबत आहे, असे सगळ्या प्रचार सभेत सांगितले जाते. पण मुंबईच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) कार्यकर्ते दिसत नाहीत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते (Congress Worker) देखील दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि या पक्षाचे तीनही नेते या तमाशात सहभागी असतील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते गोरेगाव, मुंबई येथील वंचितचे उमेदवार परमेश्वर रणशुर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात (Mumbai North West Constituency) शिवसेना ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार आहे (Shivsena Eknath Shinde). तर अमोल किर्तीकरांचे वडील गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) हे शिंदे गटासोबत आहेत. यावरून देखील प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक व्यक्तव्य केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर शंभर टक्के भाजपसोबत जातील. लोकसभेच्या निवडणुकीचा तमाशा आपण याठिकाणी बघत आहोत. बाप एका पक्षात, पोरगा एका पक्षात. जशी सत्ता काही आपल्या कुटुंबातून जाता कामा नये, अशी परिस्थिती याठिकाणी आहे. हे नकली नाटक आहे, दिखाव्याचे नाटक आहे, यावर विश्वास ठेवू नका.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, खासगीकरणाच्या माध्यमातून इथल्या मागासवर्गीयांच्या आणि वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जात आहेत. या लोकसभा निवडणुकीत मतदान कमी झाले आहे, याचा फटका भाजपला बसणार आहे. ते ४०० पार नव्हे २५० पर्यंत आलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.