IMD On Monsoon Update | पावसाची चाहुल, मान्सून काही तासांच्या अंतरावर, केरळसह राज्यात वेळेवर होणार आगमन, पुण्यात येऊ शकतो ‘या’ तारखेला

0

पुणे : IMD On Monsoon Update | अनुकूल हवामान परिस्थिती असल्याने ६ जून रोजी कोकणात मान्सूनचे आगमन होईल. दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि निकोबार बेटांवर पुढील ४८ तासात नैऋत्य मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे केरळ आणि राज्यात देखील मान्सून वेळेवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे.

३१ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल. यामुळे राज्याच्या इतर भागात मान्सूनच्या आगमनाबाबत उत्सुकता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, मान्सून ५ जून रोजी गोव्यात दाखल होऊन ६ जूनपर्यंत कोकणात पोहोचू शकतो. ७ जूनपर्यंत पुण्यात येण्याचा अंदाज आहे.

विशेष म्हणजे या वर्षी मान्सूनच्या प्रारंभादरम्यान बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ तयार झालेले नाही. ज्यामुळे मान्सून कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करु शकणार आहे. २००५ पासून, आयएमडीने सांख्यिकीय पद्धती वापरून केरळमध्ये मान्सूनच्या आगमन तारखेचा अंदाज वर्तवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.