Pune Datta Nagar Crime | ‘तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो’ ! पितापुत्राच्या पोटात चाकूने सपासप वार करुन जीव ठार मारण्याचा प्रयत्न

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Datta Nagar Crime | दारू पिऊन गोंधळ घालणार्‍याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार्‍या ज्येष्ठाला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी तरुण वडिलांना घेऊन गेला असता तुला पण तुझ्या बापासोबत संपवून टाकतो, असे म्हणून पितापुत्रांच्या पोटात चाकूने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). ही घटना दत्तनगरमधील टेल्को कॉलनीत (Datta Nagar Telco Colony Pune) रविवारी रात्री ९ वाजता घडली.

या घटनेत नवनाथ आनंदा कुलथे (वय ४६, रा. दत्तनगर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी संग्राम धुळुबा शिंदे (वय ४८, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) याला अटक केली आहे. याबाबत गौरव नवनाथ कुलथे (वय २४, रा. टेल्को कॉलनी,दत्तनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३५/२४) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच गल्लीत राहतात़ संग्राम हा दोन महिन्यांपूर्वी गल्लीत दारु पिऊन गोंधळ घालत होता. तेव्हा फिर्यादीचे वडिल नवनाथ कुलथे यांनी त्याला रागावून समजावून सांगण्यात प्रयत्न केला होता. त्याचा राग मनात धरुन संग्राम याने रविवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांना शिवीगाळ केली होती. हे गौरव याला समजल्यावर रात्री तो वडिलांना घेऊन जाब विचारण्यासाठी संग्राम याच्याकडे गेला होता.

त्यावेळी संग्राम याने तुला आताच संपवून टाकतो, असे म्हणत त्याने फिर्यादीच्या वडिलांच्या पोटात चाकूने सपासप अनेक वार केले. त्यांना वाचविण्यासाठी गौरव पुढे गेला असता तुला पण तुझ्या बापासोबत आजच संपवून टाकतो, असे म्हणून त्यांच्याही पोटात चाकूने वार करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करीत आहेत.

Fire At Pune Railway Station | पुणे रेल्वे स्टेशनवरील डब्याला मध्यरात्री आग; यार्डातील डबा जळून खाक, जीवित हानी नाही (Video)
TET Exam Scam | टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने न्यायालयाने केले परत
Pune Lashkar Crime | झोमॅटो डिलीव्हरी बॉयला मारहाण करणार्‍यांना लष्कर पोलिसांकडून 8 तासाच्या आत अटक

Leave A Reply

Your email address will not be published.