Pune Lashkar Crime | झोमॅटो डिलीव्हरी बॉयला मारहाण करणार्‍यांना लष्कर पोलिसांकडून 8 तासाच्या आत अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Lashkar Crime | कॅम्प परिसरातील (Pune Camp) दादुस स्वीट मार्ट येथून झोमॅटोची ऑर्डर घेवुन पार्क केलेली दुचाकी काढत असताना डिलीव्हरी बॉयला मारहाण केल्याप्रकरणी लष्कर पोलिसांच्या (Lashkar Police Station) तपास पथकाने अवघ्या 8 तासांमध्ये चौघांना अटक केली आहे.

सोहेल शेख (रा. मंगळवार पेठ), साहिल कुरेशी (226, मंगळवार पेठ), आयान शेख (रा. मंगळवार पेठ) आणि फैजान आश्पाक शेख (रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सदरील गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे करीत होते. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आरोपी हे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.

आरोपी फैजान आश्पाक शेख याला झोन-1 च्या पोलिस उपायुक्तांनी दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारी आदेशाचा भंग करून त्याने पुन्हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त प्रविण पवार, अप्पर आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सुर्वे, व.पो.नि. नरेंद्र मोरे, महिला एपीआय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलिस हवालदार विलास शिंदे, महेश कदम, पोलिस अंमलदार लोकेश कदम आणि सागर हराळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Pune Sahakar Nagar Police | झोमॅटोची डिलीव्हरी करणार्‍या पिता-पुत्रास लुटणार्‍या तिघांना सहकारनगर पोलिसांकडून अटक (Video)
Pune Police News | पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून 2 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई, एका महिलेचा समावेश
Pune Crime News | पैसे वसुलीसाठी तरुणाचे अपहरण करणार्‍या तिघांना अटक; माळशिरस येथून केली सुटका

Leave A Reply

Your email address will not be published.