Hoarding Collapse On Pune Solapur Road | पुणे-सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळले, घोडा जखमी (Videos)

0

पुणे : – Hoarding Collapse On Pune Solapur Road | मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. ही घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवड शहरतील मोशी (Hoarding Collapse In Moshi Pimpri Chinchwad) येथे एक होर्डिंग कोसळले. स्पाईन रोड मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकातील (Jai Ganesh Samrajya Chowk) २० बाय ४० फुट आकाराचे होर्डींग गुरुवारी पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले. यामध्ये टेम्पो, कार, पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटना ताज्या असतानाच पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway) गुलमोहर लॉन्स (Gulmohar Lawns in Loni Kalbhor) येथे एक होर्डिंग कोसळले आहे. त्यामुळे होर्डिंगचा विषय ऐरणीवर आला आहे.

पुणे शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी पाऊस व वाऱ्याला सुरुवात झाली. पुणे-सोलापूर महामार्गावरील गुलमोहर लॉन्स येथे एक होर्डिंग रस्त्यावर पडले. यामध्ये एक घोडा गंभीर जखमी झाला आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कारवाई होताना दिसत नाही. शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने होर्डिंग पडून दुर्घटना घडत आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

पुणे- सोलापूर महामार्गालगत तसेच दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे होर्डिंग मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनचालक यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे किंवा इतर कारणांमुळे होर्डिंग कोसळल्यास जीवितहानी होण्याचा मोठा धोका आहे. या होर्डिंगवर कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.