FIR On BJP Office Bearer In Pune | रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यावर FIR, ‘हे’ ठरलं कारण

Pune BJP News | Who will be the city president of BJP? Will those who hold the posts get a chance or will they choose a new one?

पुणे : – FIR On BJP Office Bearer In Pune | पुणे लोकसभेच्या (Pune Lok Sabha 2024) निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडलं आहे (Lok Sabha Polls In Pune). याच मतदानाच्या दरम्यान भाजप (BJP Candidate Pune) आणि काँग्रेसचे उमेदवार (Congress Candidate Pune) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आंदोलन केले. त्यात दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी व कर्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) परिसरात बेकायदा जमाव जमवून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर (Rajendra Shilimkar), महेश बावळे (Mahesh Wable) यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई अभिजीत वालगुडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि कार्यकर्त्यांनी पद्मवती (Padmavati) परिसरात पैसे वाटपाचा आरोप करून सहकारनगर पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या रविवारी (दि. 12 मे) ठिय्या आंदोलन केले होते.

आमदार आणि लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक शिळीमकर, वाबळे यांच्यासह पदाधिकारी सहकारनगर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात बेकायदा जमाव जमवून घोषणाबाजी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अचारसंहितेचा भंग, तसेच बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.