Uddhav Thackeray On JP Nadda | भाजपा आता सक्षम, आरएसएसची आवश्यकता नाही, नड्डांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला, म्हणाले…

0

मुंबई : Uddhav Thackeray On JP Nadda | महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) संयुक्त पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे आदी नेते उपस्थित होते. यावेळी सर्वच नेत्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला तसेच आगामी निवडणुकीतील यशाबद्दल अंदाज वर्तवला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला नकली म्हणणारे उद्या रा. स्व. संघाला नकली म्हणतील हे मी व्यक्त केलेले भाकित भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुलाखतीवरून स्पष्टच झाले आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला सर्वच्या सर्व ४८ जागा मिळतील असा दावा केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या देशभक्त बंधु भगिनीनो या शब्दाला आक्षेप घेणारे देशद्रोही आहेत. या देशातील हिंदु, मुस्लिम, शिख, इसाई, सर्व देशभक्त आहेत. पंतप्रधान पदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, भाजपकडे एकच चेहरा आहे आणि तोही आता चालत नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा करून आम्ही आमचा नेता निवडू, असे ठाकरे म्हणाले.

तर काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४८ पैकी ४६ जागा मिळतील. तसेच शरद पवार यांनीही खरगेंच्या दाव्याला दुजोरा दिला.

खरगे म्हणाले की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto 2024) जी आश्वासने दिली आहेत, त्यावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून किमान समान कार्यक्रम तयार केला जाईल. काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीग साठी तयार केला आहे, अशी टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आता म्हणतात माओ वादयांची त्यावर छाप आहे, मोदी एका कुठल्या तरी विधानावर ठाम, रहा, तुम्हीच माओचे बाप आहात, असे खरगे म्हणाले.

तर शरद पवार म्हणाले, राहुल गांधी (Rahul Gandhi) आता निवडणुका होईपर्यंत सावरकरांबद्दल काही बोलत नाहीत, अशी टीका भाजप करीत आहे, पण हा काही निवडणुकीतील मुद्दा आहे का, असे पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.