Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | गणेशजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम’ ! ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजन’

0

पुणे : Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेश जयंतीनिमित्त (Ganesh Jayanti) येत्या मंगळवारी (दि. १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना गणेश भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन (Punit Balan) यांनी केले आहे.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ परिसरात हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. मंगळवारी सकाळी ८ ते ९ दरम्यान भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते १२ या वेळेत गणेश यागाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वा. ले. जनरल. डी. बी. शेकटकर यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती करण्यात येणार आहे. दु. १२.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान भजन सेवा असणार आहे. सायंकाळी ४ ते ५.३० वाजता बी. व्ही. आय. पुणे यांच्यातर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट परिसरात अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ६ ते ७.४५ वाजण्याच्या सुमारास श्रींचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता गिरनार शक्तीपीठाचे पिठाधीश महेशगिरी बापू महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. रात्री ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान शंकर महाराज भजनी मंडळ यांच्यावतीने भजन संध्या कार्यक्रम होणार असल्याची माहिती उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असून पुण्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं माझं आवाहन आहे.’’

– पुनीत बालन (उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट

Leave A Reply

Your email address will not be published.