Murder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेत वस्ताऱ्याने गळ्यावर वार करुन खून : फरासखाना पोलिसांकडून आरोपीला अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Murder In Budhwar Peth Pune | पत्नीसोबत दुसरे लग्न केल्याच्या रागातून माथेफिरू पहिल्या पतीने साथीदाराच्या मदतीने दुसऱ्या पतीच्या गळ्यावर वस्ताऱ्याने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना बुधवार पेठेत घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.9) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास म्हसोबा मंदीराजवळील सार्वजनिक रोडवर घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Pune Crime News)

नईम अकबर शेख असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयत व्यक्तीच्या 23 वर्षीय पत्नीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रुबेल उर्फ कलाम शैदुल शेख याला अटक केली आहे. तर अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 302, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दुसरे लग्न झाले असून मयत नईम शेख हे त्यांचे दुसरे पती आहेत.
शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे पती म्हसोबा मंदिरासमोरील सार्वजनिक रोडवर मुलीला फिरवत होते.

त्यावेळी त्यांचा पहिला पती आरोपी रुबेल शेख व त्याचा साथीदार त्याठिकाणी आले.
नईम शेख याने फिर्य़ादी यांच्यासोबत दुसरे केल्याचा राग आरोपीच्या मनात होता.
याच रागातून त्याने नईम यांच्या गळ्यावर वस्ताऱ्याने वार करुन खून केला. घटनेनंतर आरोपी पळून गेला. मात्र, फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) घटना घडल्यानंतर काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत तर त्याचा साथीदार फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दाढे करीत आहेत.

Pune Bharti Vidyapeeth Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक
Pune Crime Court News | पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता
Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचे आजपासून बेमुदत उपोषण, मराठा बांधवांना केले आवाहन, ”सर्व आमदारांना फोन करा…”

Leave A Reply

Your email address will not be published.