Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणकांची भेट; युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते संगणक लॅबचे उद्घाटन (Video)

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Indrani Balan Foundation | मुलींच्या शिक्षणात अग्रेसर असलेल्या ‘एसएनडीटी कॉलेज’ला (SNDT College) ‘इंद्रायणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने 60 अद्ययावत संगणक नुकतेच भेट देण्यात आले. या संगणक लॅबचे उद्घाटन (Inauguration of Computer Lab) फाऊंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन (Young entrepreneur Punit Balan) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, मुख्याध्यापिका डॉ. अंजली कदम यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

युवा उद्योजक पुनीत बालन आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून देशभर मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, क्रिडा, संरक्षण या क्षेत्राचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्र हे विकासाचा पाया रचण्यात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी मदत केली जाते. याच उद्देशाने ‘एसएनडीटी’ कॉलेजसाठी संगणक देण्यात आले.

यावेळी बोलताना उपकुलगुरू चक्रदेव म्हणाल्या की, ‘‘या आद्ययावत संगणकांमुळे मुलींना अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मदत होणार आहे, याआधी संगणकांची संख्या कमी असल्यामुळे मुलींना संगणक शिकण्यासाठी कमी वेळ मिळायचा. पण आता ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने केलेल्या या अमूल्य मदतीमुळे मुलींना संगणक अधिक वेळ वापरता येईल. या मदतीबद्दल फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक आभारही मानले.

‘‘आजच्या ‘आयटी’च्या युगात संगणक शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रामुख्याने मुलींना प्रतिष्ठा, आत्मसन्मान मिळण्यासाठी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी हे शिक्षण गरजेचं आहे. ‘एसएनडीटी कॉलेज’कडे पुरेसे संगणक उपलब्ध नसल्याने विद्यार्थीनांना संगणक शिक्षणासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी संगणक उपलब्ध करून देण्याची संधी आम्हाला मिळाली. या मुली येथे शिक्षण घेऊन जगात उंच भरारी घेऊन आपल्या शहराचं आणि देशाचं नाव उज्वल करतील असा विश्वास आहे.’’

पुनीत बालन (अध्यक्ष, इंद्राणी बालन फाऊंडेशन)

Leave A Reply

Your email address will not be published.