Pune Police MPDA Action | चतु:श्रृंगी परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 68 वी स्थानबध्दतेची कारवाई

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MPDA Action | चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshringi Police Station) हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार आदित्य उर्फ राज कुमार मानवतकर (वय-20 र. गणपती मंदिराजवळ, संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, पाषाण) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 68 वी कारवाई आहे.

आरोपी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल (Pistol), कोयता, चाकू या सारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे, विनापरवाना पिस्तुल (Pistol) बाळगून दहशत पसरवणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागिल पाच वर्षात त्याच्यावर 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीवितास व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

आरोपी राज मानवतकर याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्ध (Pune Police MPDA Action) करण्याचा
प्रस्ताव पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी राज मानवतकर याला एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारावाई चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Senior PI Balaji Pandhare), गुन्हे शाखा,
पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre), पोलीस अधिकारी व अंमलदार
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.