Kolhapur ACB Trap | कोल्हापुरात अन्न औषध प्रशासनाची ‘कीर्ती’ 25 हजारांची लाच घेताना महिला अधिकारी जाळ्यात! घरात सापडले 80 तोळे सोन्याचे दागिने, रोकड अन् हिरे

0

कोल्हापूर : – Kolhapur ACB Trap | हॉटेलवरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी एक लाखाची मागणी करुन 25 हजार रुपये लाच घेणाऱ्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती धनाजी देशमुख Kirti Dhanaji Deshmukh (वय-32 सध्या रा. ताराबाई पार्क, मूळ रा. समर्थ नगर, मोहोळ जि. सोलापूर) यांना शुक्रवारी (दि.26) कोल्हापुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. (Kolhapur Bribe Case)

किर्ती देशमुख यांच्यावर एसीबीने कारवाई केल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी 80 तोळे सोन्याचे दागिने, साडेतीन लाख रुपयांची रोकड आणि साडे तीन लाख रुपये किमतीचा हिऱ्याचा हार असे घबाड एसीबीच्या हाती लागले. अन्न सुरक्षा अधिकारी लाचखोरीच्या जाळ्यात सापडल्याने अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कीर्ती देशमुख यांना आज (शनिवार) कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

पुण्यातील नातेवाईकांच्या घराची झडती

एसीबीच्या पथकाकडून त्यांचे मूळ गाव मोहोळ आणि पुण्यातील नातेवाईकांच्या घराचीही झडती घेण्यात येत आहे, अशी माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale) यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. कीर्ती देशमुख यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) भ्रष्टचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी

तक्रारदर व्यवसायायिकाचे हातकणंगले तालुक्यातील किणी येथे सम्राट फूडस नावाचे रेस्टॉरंट आहे. अन्नसुरक्षा अधिकारी कीर्ती देशमुख यांनी 15 मार्च रोजी संबंधित रेस्टॉरंटची तपासणी केली होती. रेस्टॉरंटमधून त्यांनी अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून रेस्टॉरंटवर कारवाई न करण्यासाठी कीर्ती देशमुख यांनी एक लाख रुपये लाच मागितली. त्यावेळी एवढी मोठी रक्कम देण्यास तक्रारदार यांनी असमर्थता दर्शवली. त्यानंतर 70 हजारांवर तडजोड झाली. त्यापैकी पहिला टप्पा 25 हजार रुपये देशमुख यांनी मागितले. याबाबत व्यावसायिकाने कोल्हापूर एसीबीकडे तक्रार केली.

पार्किंगमध्ये कारवाई

कीर्ती देशमुख यांनी लाचेची रक्कम घेऊन व्यावसायिकाला आपल्या राहण्याच्या ठिकाणी ताराबाई पार्क येथील विश्व रेसिडेन्सीमधील पार्किंग येथे येण्यास सांगितले. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये लाच स्वीकरत असताना एसीबीच्या पथकाने देशमुख यांना रंगेहाथ पकडले. यावेळी 17 लाख रुपयांची अलिशान मोटारही जप्त करण्यात आल्याचे सरदार नाळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.