Pune Crime News | ट्रेलर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नगर – पुणे रोडवरील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | कामावर निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या मोठ्या ट्रेलर ट्रकने मागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन तरुणाचा मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी ट्रेलर ट्रक चालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.12) सकाळी साडे सहाच्या सुमारास नगर-पुणे रोडवरील (Nagar-Pune Road) परफेक्ट वजन काट्या समोर झाला. (Pune Crime News)

स्वप्नील कांतीलाल सोनवणे (वय-26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबबात गणेश लक्ष्मण आरे (रा. विठ्ठलवाडी, वाघोली, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन ट्रेलर ट्रक क्रमांक एमएच 14 9599 यावरील चालकावर आयपीसी 304अ, 279, 337, 338, 427 सह मोटर वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत स्वप्नील सोनवणे हा फिर्यादी गणेश आरे यांच्याकडे कामाला होता.
मंगळवारी सकाळी साडेसहा च्या सुमारास स्वप्नील त्याच्या दुचाकीवरुन वाघोली बकोरी फाटा येथील ऑफिसमध्ये
कामासाठी जात होता. त्यावेळी पाठीमागून एक ट्रेलर ट्रक भरधाव वेगात आला. ट्रक चालकाने बेदरकार वाहन
चालवून (Pune Accident News) फिर्यादी यांच्या कामगाराच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
यामध्ये गंभीर जखमी होऊन सोनवणे याचा मृत्यू झाला असून या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले आहे.
पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.