Pune Crime News | पुणे : भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकावर ब्लेडने वार, तरुणीसह तिघांना अटक

0

पुणे : – भाडे नाकारल्याच्या रागातून तिन जणांनी एका रिक्षाचालकावर ब्लेडने वार (Blade Attack) करुन बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.30 एप्रिल) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास संविधान चौकातील (Samvidhan Chowk Pune) काकडे मैदानाच्या फुटपाथवर घडला आहे. याप्रकरणी एका तरुणीसह तीन जणांना वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) अटक केली आहे.

याबाबत कुणाल बाळू कदम (वय-36 रा. कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अजर बादशाह शेख (वय-32 रा. गणेश अपार्टमेंट, केशवनगर, कोंढवा), अक्षय लक्ष्मण पवार (वय-20 रा. काकडे मैदान, संविधान चौक, वानवडी), आरती सनी जगताप (वय-29 रा. संविधान चौक सर्कल, वानवडी) यांच्यावर आयपीसी 326, 323, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा चुलत भाऊ त्याची रिक्षा (एमएच 12 व्हि.बी. 4721) घेऊन राहत्या घरी जात होता. संविधान चौकातील काकडे मैदानाच्या जवळ असलेल्या फुटपाथवर थांबलेल्या आरोपींनी रिक्षाला हात दाखवला. आरोपींनी फिर्यादी याच्या भावाकडे मुंढवा येथे जायचे आहे असे सांगितले. मात्र, त्याने मुंढवा येथे जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने अजर शेख याने त्याच्याजवळ असलेल्या ब्लेडने फिर्यादी यांच्या भावाच्या पोटावर वार करुन जखमी केले. तर इतर आरोपींनी त्याला पकडून हाताने मारहाण करुन जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. कुणाल कदम यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

तरुणावर कोयत्याने वार

येरवडा : काहीही कारण नसताना आठ जणांच्या टोळक्याने तरुणाच्या अंगावर धाऊन जात मारहाण केली. तसेच एकाने तरुणाच्या डोक्यात कोयता मारुन जखमी केले (Koyta Attack) . हा प्रकार मंगळवारी (दि.30) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास यशवंतनगर येथे घडला आहे. याप्रकरणी अमित देवीराज काते (वय-23 रा. यशवंतनगर, येरवडा) याने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सौरभ मल्लेश राठोड (वय-19 रा. येरवडा), आमन, शुभम पांडव, अंश राजपुत, कैफ शेख, विश्वास वाघमारे, सौरभ राठोड, कार्तिक चव्हाण यांच्यावर आयपीसी 326, 323, 143, 147, 149 सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. तसेच कोयत्याने डोक्यात वार करुन काचेची बाटली फोडून जखमी केले. तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.