Pune Crime News | तरुणीकडे पाहून अश्लील इशारे करुन विनयभंग, औंध परिसरातील घटना

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | तरुणीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत स्वत:च्या अंगावरील कपडे काढले. तसेच तरुणीकडे पाहून अश्लील इशारे करुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Pune Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.11) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास औंध येथील इंदिरा वसाहत येथे घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत 30 वर्षीय तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून पुष्पक बाळा खंडाळे (रा. इंदिरा वसाहत, औंध) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 352, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात.
सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास आरोपी खंडाळे याने फिर्यादी तरुणीच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत
आरडा ओरडा केला. त्यावेळी चाळीत राहणाऱ्या इतर महिला त्याठिकाणी आल्या असता आरोपीने महिलांना
अश्लील शिवीगाळ केली. तसेच अंगावरील कपडे काढले.
यानंतर त्याने फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील इशारे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी चाळीत राहणाऱ्या एका महिलेने खंडाळे याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने महिलेला मारण्याच्या उद्देशाने अंगावर धाऊन गेल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- मित्रांसोबत फिरायला गेला अन् गमावला जीव, मुळशीतील प्लस व्हॅलीच्या 1200 फूट खोल दरीत तरुण पर्यटकाचा मृत्यू
- ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला तलाठ्यासह मदतनीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
- Pune Pimpri Chinchwad Crime News | वडिलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला मारहाण, वायसीएम हॉस्पिटलमधील घटना