Pune Crime News | पत्नीला भेटण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाला डोकं फुटेपर्यंत मारहाण, धनकवडी परिसरातील घटना
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीत येणं जावयाला (Son-in-Law) चांगलेच महागात पडले आहे. सासरकडच्या लोकांनी संगनमत करुन घरगुती भांडणावरून (Domestic Dispute) जावयाला डोकं फुटेपर्यंत बेदम मारहाण केली. यामध्ये जावयी गंभीर जखमी झाला असून हा प्रकार धनकवडी परिसरात घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि.10) दुपारी दोनच्या सुमारास धनकवडी (Dhankawadi) येथील मयुर कॉम्प्लेक्समध्ये घडला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Pune Police) चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत राजेश तुळसीराम उणेचा (वय-34 रा. कुलभुषण सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रोड, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सासू हेमलता मुलचंद डांगी (वय-50), सासरे मुलचंद पुकराज डांगी (वय-55), मेहुणा प्रथमेश मुलचंद डांगी आणि पुजा मुलचंद डांगी (सर्व रा. मयुर कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश उणेचा हे पत्नीला भेटण्यासाठी धनकवडी येथे सासुरवाडीला गेले होते.
त्यावेळी सासरच्या लोकांनी संगनमत करुन घरगुती कारणावरुन फिर्यादी यांच्या सोबत वाद घातले.
यानंतर त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तर सासू हेमलता डांगी यांनी कोणत्यातरी जड वस्तूने फिर्यादी
यांच्या डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- पुण्यात दोन ठिकाणी घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज लंपास
- ‘कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल’ फसवणूक प्रकरण ! शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, रोहित भार्गव यांच्यावर गुन्हा दाखल
- पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने साडे 16 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार
- ‘काला पिला’ जुगार खेळण्यासाठी घेऊन जावुन तरुणाला लुटले
- शिवीगाळ करु नका सांगितल्याच्या कारणावरुन वार
- Bombay High Court | ‘लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडल्यास विनयभंग नाही’, कोर्टाकडून आरोपीची निर्दोष सुटका