Pune Crime News | पुण्यात दोन ठिकाणी घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

Burglary

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये घरफोडीचे (Burglary) गुन्हे वाढत आहे. बंद सदनिकांमधून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्याकडून लंपास केला जात आहे. शहरातील वानवडी आणि कोंढव्यात झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी वानवडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात (Pune Police) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune News)

वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) भुषण मुरलीधर फिरके (वय-40 रा. सातवनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध आयपीसी 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे कुटुंबियांसह घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या टेरेसच्या दरवाजाची लोखंडी जाळी कापून आतील कडी उघडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करुन बेडरुममध्ये ठेवलेले 1 लाख 31 हजार रुपये किंमतीचे 57.5 ग्रॅम सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व रोख रक्कम चोरून नेली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे (PSI Sonwane) करीत आहेत. (Pune Crime News)

घरफोडीची दुसरी घटना कोंढवा खुर्द परिसरात घडली आहे. याबाबत आमराराम चंद्राराम कुमावत
(वय-38 रा. शिवनेरी नगर, मुनज्जा अपार्टमेंट, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station)
फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आज्ञात चोरट्या विरुद्ध आयपीसी 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
चोरट्यांनी फिर्यादी यांच्या राहत्या घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरातील बेडरुममधील कपाटाचे लॉक तूडन 3 लाख 12 हजार 500 रुपयांचे 4.5 ग्रॅम सोन्याचे दागिने,
रोख रक्कम चोरुन नेली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर (API Baber) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा