Pune Crime News | पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने साडे 16 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | व्हॉट्सअॅप आणि टेलीग्रामवर संपर्क करुन प्रीपेड पार्ट टाईम जॉब (Prepaid Part Time Job) देण्याचे आमिष दाखवून 16 लाख 50 हजार 894 रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Pune Police) सायबर गुन्हेगारांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2 ते 6 सप्टेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत अंजन कुमार (वय-48 रा. धानोरी गाव, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 93356XXXXX मोबाईल धारक, टेलीग्राम धारक, विविध बँक खाते धारक आरोपींवर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी मोबाईल आणि टेलीग्राम धारक आरोपींनी फिर्य़ादी यांना संपर्क साधला.
त्यांना व्हॉट्सअॅप व टेलीग्रामवर मेसेज पाठवण्यात आले. प्रीपेड पार्ट टाईम जॉब देण्याचे आमिष दाखवले.
या कामासाठी त्यांना वेगवेगळे टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम देऊन फिर्यादी
यांचा विश्वास संपादन केला. मात्र, त्यानंतर अधिक पैसे पाहिजे असल्यास काही रक्कम द्यावी लागेल असे सांगून फिर्यादी यांना पैसे भरण्यास भाग पाडले.

त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर 16 लाख 50 हजार 894 रुपये
भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे जमा केला.
मात्र, त्यानंतर अंजन कुमार यांना कोणत्याही प्रकारचा टास्क अथवा घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर (Senior PI Dattatraya Bhapkar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.