Pune Crime News | ‘काला पिला’ जुगार खेळण्यासाठी घेऊन जावुन तरुणाला लुटले

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | बुलढाणा येथे गावी जाण्यासाठी बसची वाट पाहात उभारलेल्या तरुणाला जबरदस्तीने ‘काला पिला’ जुगार (Gambling) खेळायला घेऊन जात त्याच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन 35 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार रविवारी रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान खराडी बायपास रोडवर (Kharadi Bypass Road) घडला. (Pune Crime News)
याबाबत किशोर एकनाथ खंडागळे (वय-31 रा. मैत्री पार्क, सासवड, ता. पुरंदर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्य़ाद दिली. यावरुन चार अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 392, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी खंडागळे हे त्यांच्या गावी जाण्यासाठी खराडी बायपास येथे बसची वाट पाहात उभे होते. त्यावेळी एका आरोपीने त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्यासोबत ओळख करुन घेतली. (Pune Crime News)
त्या व्यक्तीने फिर्य़ादी यांना ‘काला पिला’ जुगाऱ खेळायला जबरदस्तीने घेऊन गेला.
त्या ठिकाणी असलेल्या इतर आरोपींनी त्यांना तुम्ही आत्ताच 35 हजार रुपये जिंकलात, असे सांगितले.
मात्र, फिर्यादी यांनी मी अजून खेळलोच नाही. तर मी कसा जिंकलो? असा प्रश्न केला.
त्यावेळी आरोपींनी चिडून जाऊन फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच तुझ्याकडे पैसे असल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही, असे बोलून खंडागळे यांच्या मोबाईलवरुन जबरदस्तीने 35 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले, असे फिर्य़ादीत नमूद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाकडे (PSI Wakade) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | शिवीगाळ करु नका सांगितल्याच्या कारणावरुन वार
- Manoj Jarange Patil | जरांगेंचा भुजबळ-पडळकरांना इशारा, ‘जीभेला आवर घाला’; फडणवीसांवर केला आरोप, ‘गोड बोलून डाव टाकायचे…’
- Bombay High Court | ‘लैंगिक हेतूशिवाय मुलीचा हात पकडल्यास विनयभंग नाही’, कोर्टाकडून आरोपीची निर्दोष सुटका
- Pune Fire News | कसबा पेठेत जुन्या लाकडी वाड्याला आग