Pune Crime News | ‘कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल’ फसवणूक प्रकरण ! शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, रोहित भार्गव यांच्यावर गुन्हा दाखल

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | आयुष्मती ट्रस्ट (Ayushmati Trust) या संस्थेकडे ‘कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल’ची (Canary High International School) मान्यता असून त्याआधारे शाळा सुरु करण्याच्या बहाण्याने 1 कोटी 17 लाख 67 हजार 579 रुपये गुंतवण्यास सांगून भागीदारी दिली. मात्र, कोणतेही अधिकार न देता शाळा बंद करुन फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) न्यायालयाच्या आदेशावरुन तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी सी.पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या (C.P. Goenka International School) प्राचार्या शेफाली तिवारी (Principal Shefali Tiwari), तन्मय शर्मा (Tanmay Sharma), रोहित भार्गव Rohit Bhargava (तिघे रा. पुणे नगर रोड, वाघोली) यांच्यावर आयपीसी 406, 415, 420, 500, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुर्णिमा मिलिंद कोठारी Purnima Milind Kothari (वय-63 रा. आगाखान पॅलेस समोर, नगर रोड, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2019 ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल’ शास्त्रीनगर, येरवडा येथे घडला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफाली तिवारी या सी.पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य आहेत. त्यांनी फिर्य़ादी कोठारी यांना त्यांची आयुष्मती ट्रस्ट नावाची संस्था असल्याचे सांगितले. या ट्रस्टकडे ‘कॅनरी हाय इंटरनॅशनल स्कूल’ चालवण्याची परवानगी असल्याचे भासवेल. ही शाळा सुरु करुन एक ते दोन वर्षांसाठी पैसे गुंतवणूक (Investment) करण्यास सांगितले. तसेच फिर्यादी यांना भागिदार करुन घेण्याचे आमिष दाखवून त्यांना 1 कोटी 17 लाख 67 हजार 579 रुपये खर्च करण्यास भाग पाडले.

कोठारी आणि त्यांच्या मुलाला 70 टक्के भागिदारी देण्यात आली. मात्र, त्यांना कोणतेही अधिकार दिले नाहीत.
आरोपींनी शाळेच्या नावावर असलेल्या बँक खात्यात जमा होणारा निधी स्वत:च्या फायद्यासाठी वापरली.
शांळा बंद पडल्यानंतर पालकांनी याबाबत आरोपींकडे विचारणा केली. त्यावेळी शाळा बंद पडण्यास फिर्य़ादी कोठारी
हे कारणीभूत असल्याचे विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगून त्यांची बदनामी केली. याप्रकरणी कोठारी यांनी न्यायालयात
तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने 156 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले आहे.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नांगरे (PSI Nangare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.