Gold-Silver Rate Today | सोन्याचा नवा विक्रम! चांदी देखील महागली, जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – सोने-चांदीचे दर (Gold-Silver Rate Today) सतत वाढत आहेत. आता तर सोन्याच्या दराने सर्वोच्च विक्रम केला आहे. वायदे बाजारात सोन्याचा भाव प्रथमच ६२ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. दोन आठवड्यांपूर्वी सोन्याने ६१,९१४ रुपयांचा उच्चांक गाठला होता. आता नवा विक्रम केला आहे. (Gold-Silver Rate Today)

डॉलरच्या निर्देशांकात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे परदेशी बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तसेच भू-राजकीय तणाव कमी झालेला नसल्याने भारताच्या वायदे बाजारावरही त्याचा स्पष्ट परिणाम दिसत आहे. फ्युचर्स मार्केट मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. काल रात्री सोन्याचा दर ८५५ रुपयांनी वाढून तो ६२,३९५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर गेला. (Gold-Silver Rate Today)

सोन्याने ६२,४२१ रुपयांचा नवीन उच्चांक गाठला असला तरी आज सोन्याचा भाव ६१,६१९ रुपये प्रति दहा ग्रॅमवर खुला झाला.
तसेच चांदीचा दर देखील वाढत असून चांदीचा भाव ५५९ रुपयांच्या वाढीसह ७५,३६५ रुपयांवर व्यवहार करत आहे.
आज चांदीचा दर ७५,४३६ रुपये प्रति किलो उच्चांकावर गेला. सकाळी चांदीचा ७४८०६ रुपयांवर खुली झाली.
सोमवारी चांदीचा भाव या पातळीवर बंद झाला होता.

सोन्याच्या आधाराने चांदीचा वायदा ८० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यामुळे चांदीची किंमत १ लाख रुपयांपर्यंत
जाण्यास वेळ लागणार नाही, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.