Pune Crime News | एसटी बस चालकाला शिवीगाळ करुन मारहाण, रिक्षाचालकाला अटक; लोणी काळभोर येथील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | एसटी बस चालकाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) एच.पी. गेट नं. 2 समोर घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Police) रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.27) सकाळी अकराच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

याबाबत एसटी चालक योगेश सिद्धेश्वर खडके (वय- 37 रा. भांडगाव ता. दौंड, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) मंगळवारी (दि.28) फिर्याद दिली आहे. यावरुन रिक्षाचालक हसन समशेर पठाण (वय-40 रा. इनामदार वस्ती, लोणी काळभोर) याच्यावर आयपीसी 353, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपी रिक्षा चालक हसन पठाण यांनी सोमवारी एसटी बसचालक योगेश खडके विरोधात तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश खडके एसटी बस पुणे-सोलापूर महामार्गावरुन लातूर येथे घेऊन जात होते. एच.पी. गेट नं. 2 समोर आरोपी हसन पठाण याने त्याच्या ताब्यातील रिक्षा एसटी बसला आडवी घालून बस थांबवली. त्यानंतर बसचालक खडके यांना शिवीगाळ करुन बसचा दरवाजा उघडला. आरोपीने बसमध्ये जाऊन खडके यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन शर्ट फाडला. तसेच जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धायगुडे (PSI Dhaygude) करीत आहेत.

दरम्यान, आरोपी हसन पठाण याने एसटी बसचालक योगेश खडके विरोधात सोमवारी फिर्य़ाद दिली आहे.
हसन पठाण हे पुणे सोलापूर रोडवरुन त्यांची रिक्षा घेऊन जात होते. एच.पी. गेट नं. 2 समोर एसटी बसची धडक
फिर्यादी यांच्या रिक्षाला पाठीमागून बसली. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपी एसटी बस चालक योगेश खडके याला गाडी
हळु चालवता येत नाही का, माझ्या रिक्षाला धडक का दिली अशी विचारणा केली. याचा राग आल्याने एसटी चालकाने
तुला गाडी निट चालवता येत नाही का, तु काय भाई आहे का, मला गाडी चालवायला शिकवतो का असे म्हणत
फिर्य़ादी यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन एसटी बसमधील दगड
हसन पठाण यांच्या डोक्यात घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी योगेश खडके याच्यावर आयपीसी 324, 504, 506
नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.