Lalit Patil Drugs Case | राज्य सरकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. संजीव ठाकूरला का वाचवत आहेत?, आ. रविंद्र धंगेकरांचे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

Congress MLA Ravindra Dhangekar

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Lalit Patil Drugs Case | ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमधून पळून जाण्याच्या घटनेला जवळपास महिने झाले. ज्या व्यक्तींनी ललित पाटील (Lalit Patil Drugs Case) याला पळून जाण्यास मदत केली त्या सर्वांवर कारवाई केली जात आहे. यातच तत्कालीन ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर (Sassoon Hospital Dean Dr. Sanjeev Thakur) यांना पदमुक्त करण्यात आले. ठाकूर यांच्यावर ही कारवाई पुरेशी नसून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar) हे बुधवारी (दि.29) पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर (Pune Police Commissioner Office) ठिय्या आंदोलनास बसले आहेत.

यावेळी आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले, अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाला (Lalit Patil Drugs Case) दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. ललित याच्याकडून कोण कोणते साहित्य, रोख रक्कम किती जप्त केली आहे, यासंदर्भात पोलिसांकडून माहिती दिली जात नाही. ज्या ससून हॉस्पिटलमधून ललित पाटील पळून गेला, त्यावेळचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त केले आहे. तर डॉ. देवकाते यांना बळीचा बकरा बनवत त्यांच्यावर कारवाई केली. काही पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे. ललित पाटीलशी संबंधित सगळ्यांवर कारवाई होते, मात्र, तत्कालीन ससूनचे डीन ठाकूर यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केला आहे.

धंगेकर पुढे म्हणाले, ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर यांना राज्य सरकार (State Government) आणि
वरिष्ठ पोलीस अधिकारी का वाचवित आहेत. यामागे मोठी व्यक्ती असणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज संजीव ठाकूर यांच्या अटकेची मागणीसाठी पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत संजीव ठाकूर यांना अटक होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरुच राहिल
असेही रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा