Side Effects Of Banana With Milk | ‘या’ लोकांनी एकत्र केळी आणि दूध खाऊ नये, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर आजार

Banana With Milk

एन पी न्यूज 24 ऑनलाइन –आपण अनेकदा उपवासाला केळी आणि दूध खातो (Side Effects Of Banana With Milk). तसेच अनेकदा दररोज आपण रोजच्या जेवणात दूध आणि केळीचे शिकरण देखील खातो. अनकेदा हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अनेक डॉक्टर सांगतात की, हे खाल्ल्याने शरीर मजबूत होते. याशिवाय शरीराला अनेक फायदे मिळतात. परंतु दूध आणि केळीमुळे होणारे नुकसान तुम्हाला माहिती आहे का? केळी आणि दूध काही लोकांसाठी फायदेशीर नाही (Side Effects Of Banana With Milk).

आयुर्वेदानुसार केळी आणि दूध काही लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक (Harmful To Health) आहे. त्यामुळे पचनसंस्थेचे (Digestion System) गंभीर नुकसान होत असल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर हे शरीरात विषासारखे काम करते. केळी आणि दूध एकत्र खाल्ल्याने पोटात गॅसचा त्रास होतो. केळी आणि दूध एकत्र खाण्याचे अनेक फायदे असले, तरी ते हे खाणं अत्यंत हानिकारक देखील आहे (Side Effects Of Banana With Milk).

  • केळी आणि दूध एकत्र खाण्याचे तोटे –
  • दमा / अस्थमा (Asthma)-

अस्थमाच्या रुग्णांनी केळी आणि दूध एकत्र अजिबात खाऊ नये. कारण यामुळे खोकल्याची समस्या वाढू शकते.
दमा असलेल्या व्यक्तीला खोकल्याची समस्या वाढल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

  • पचन (Digestion)

एखाद्या व्यक्तीला पोटाशी संबंधित समस्या असतील तर त्याने चुकूनही केळी आणि दूध एकत्र करून खाऊ नये.
कारण त्यामुळे पोटात पचनाच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

  • सायनस (Sinus Problem)

सायनसच्या रुग्णांनी चुकूनही केळी आणि दूध एकत्र खाऊ नये. यामुळे शरीरात ऍलर्जी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
ज्यांना ऍलर्जीचा त्रास आहे, त्यांनी दूध आणि केळी एकत्र अजिबात खाऊ नये.