Pune Crime News | आर्मी स्कुलमध्ये अॅडमिशन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, पुण्यातील घटना
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | मुलीचे आर्मी स्कुल मुंबई येथे अॅडमिशन (Army School Admission) करुन देतो असे सांगून फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने संबंधित महिलेकडून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 9 एप्रिल 2022 ते 13 एप्रिल 2022 या दरम्याने फिर्यादी यांच्या शिवाजीनगर येथील राहत्या घरी ऑनलाइन घडला. (Pune Crime News)
याबाबत टिना सुरेश होटवानी (वय-43 रा. नवरीर तानाजी सोसायटी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नवजीत सिंग (रा. माहित नाही) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा मित्र आहे. त्याने फिर्यादी यांच्या मुलीचे आर्मी स्कुल मुंबई
येथे अॅडमिशन करुन देतो असे सांगून विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी नवजीत सिंग याच्यावर विश्वास ठेऊन
वडिलांच्या बँक खात्यातून गुगल पे (Google Pay) द्वारे पाच वेळा पैसे पाठवले. फिर्यादी यांनी आरोपीला 91 हजार 145
रुपये ऑनलाईन पठवले. पैसे दिल्यानंतर अॅडमिशन झाले नाही. आरोपीने पैसे घेऊन अॅडमिशन न करता तसेच पैसे परत न करता फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी नवजीत सिंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाईकवडे (PSI Naikwade) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन पुणे मनपाची फसवणूक, दुहेरी मोक्का लावण्यात आलेल्या कुख्यात नाना गायकवाडवर पालिकेकडून FIR
- एकाच ओढणीने गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या, वाघोली परिसरातील घटना
- हॉटेलमध्ये नेऊन गुंगीचे औषध देत मुलीवर बलात्कार, पुण्यातील घटना; जळगाव येथील तरुणाला अटक
- पुणे : गोळीबाराच्या घटनांनी पुणे हादरलं, 24 तासात फायरिंगच्या 2 घटनेत सराईत गुन्हेगारासह दोघांचा खून