Rupali Chakankar On Pune Lok Sabha | मुरलीधर मोहोळांच्या विजयाबाबत रुपाली चाकणकर म्हणाल्या, 4 जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला (Videos)

0

पुणे : Rupali Chakankar On Pune Lok Sabha | पुणे लोकसभेचे महायुतीचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी गुरुवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणेकरांनी यावेळी मुरलीधर मोहोळांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद दिला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले की, पुणेकर फार चोखंदळ, सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत पण ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पुणेकरांनी केलेली गर्दी पाहून लक्षात येते की, पुणेकर फार चोखंदळ आहेत. सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत.

मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची उतराई म्हणून इतकं ऊन असतानाही पुणेकर रस्त्यावर उतरला. निवडणूक अर्ज ही फक्त औपचारिकता झाली. ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला आहे, असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला. मुरलीधर मोहोळ यांचा विजय होईल असा विश्वासही व्यक्त केला.

दरम्यान, काल पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी निवडणूक अर्ज भरला. यावेळी पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. मोहोळ यांच्याकडून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित होते. तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे (Congress) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वंचितचे (Vanchit Bahujan Aghadi-VBA) वसंत मोरे (Vasant More) हे निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, अन्य दोन उमेदवारांच्या तुलनेत मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.