Pune Crime News | भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन पुणे मनपाची फसवणूक, दुहेरी मोक्का लावण्यात आलेल्या कुख्यात नाना गायकवाडवर पालिकेकडून FIR

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | दुहेरी मोक्का लावण्यात आलेल्या नाना गायकवाड याच्यावर पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इमारतीचे बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन त्याचे स्टेट बँक ऑफ इंडियासोबत (State Bank of India) भाडेकरार करुन फसवणूक केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Pune Police) गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 डिसेंबर 2020 पासून आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

नानासाहेब शंकरराव गायकवाड Nanasaheb Shankarao Gaikwad (रा. एन एस जी हाऊस, बाणेर रोड, पुणे) आणि भोगवटा प्रमाणपत्र तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर आयपीसी 420, 467, 468, 471, 120ब, 34 सह नोंदणी अधिनियम 82, 83 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेच्या इमारत निरीक्षक कामिनी सुरेश घोलप (वय-35 रा. जांभुळवाडी, कात्रज) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. हा प्रकार सर्वे नंबर 127/1 ए ते 1 इ, प्लॉट नंबर 108 औंध, या ठिकाणी घडला.

फिर्यादी कामिनी घोलप या पुणे महानगरपालिकेमध्ये इमारत निरीक्षक म्हणून नोकरी करतात. त्यांच्याकडे बिल्डर्स यांना बांधकामाची परवानगी देणे, बांधकाम झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र देणे इत्यादी संबंधित कामे आहेत. आरोपी नाना गायकवाड याने बांधकाम केलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे भोगवटा प्रमामणपत्र पालिकेकडून घेतले नव्हते. तरी देखील त्याचा वापर सुरु केला. (Pune Crime News)

नाना गायकवाड याने इमारतीचा पहिला मजला स्टेट बँक ऑफ इंडियाला भाडे करारावर देऊन त्याचा करार नोंदवून घेतला.
भाडे करार करताना त्याने भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन ते करारनाम्यामध्ये जोडले.
नाना गायकवाड याने बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन शासनाची आणि पुणे महानगरपालिकेची फसवणूक
केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक झरेकर (API Zarekar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.