Pune Crime Firing Murder News | पुणे : गोळीबाराच्या घटनांनी पुणे हादरलं, 24 तासात फायरिंगच्या 2 घटनेत सराईत गुन्हेगारासह दोघांचा खून

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime Firing Murder News | महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या पुण्यात 24 तासात दोन गोळीबाराच्या घटना घडल्या आहे. पुणे शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे पुणे हादरलं आहे. पहिली घटना मध्यरात्रीच्या सुमारास घोरपडे पेठेत (Khadak Police Station) घडली आहे. तर दुसरी घटना सायंकाळी सिंहगड रस्ता (Sinhagad Road Police Station) परिसरात घडली आहे. (Pune Crime Firing Murder News)

रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास गाढ 

घोरपडे पेठेत राहणाऱ्या अनिल साहू (वय-35 रा. घोरपडे पेठ) याच्यावर घरात शिरुन गोळी झाडून खून करण्यात आला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मयत व्यक्तीचा भाऊ घुरणकुमार हरिदेव साहु (वय-24 रा. श्रीमंत सुवर्णभारत मित्र मंडळाजवळ, घोरपडी पेठ पुणे मुळ रा. वाजीतपुर, जि. दरभंगा, बिहार) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime Firing Murder News)

रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास गाढ झोपेत असताना अचानक दरवाजा वाजला. फिर्यादी घुरनकुमार जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडला असता समोर दाढीमिशा असलेला, अंगाने जाड अनोळखी व्यक्ती उभा होता.

अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना ‘तेरा भाई किधर है, उसको बुला’ असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी किचनमध्ये हडफोन लावून बसलेल्या अनिल साहू यांना बाहेर आलेल्या व्यक्तीविषयी सांगितले. अनिल साहू बाहेर गेले आणि त्या व्यक्तीसोबत बोलत होते. बोलत असताना त्या व्यक्तीने अनिल यांना काहीतरी विचालं. त्यावर अनिल यांनी मान हलवून नकार दिला. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने कपाळावर बंदूक लावून गोळी झाडली आणि त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी इमारतीच्या बाहेर थांबलेल्या एका दुचाकीवर अज्ञात साथीदारासह दुचाकीवरुन पळून गेला.

सिंहगड रस्ता परिसरात गोळीबार

पुण्यातील गोळीबार झाल्याची दुसरी घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ओंकार तानाजी लोहकरे
(वय 19, रा. जाधवनगर, धायरी) याच्यावर दोघा अल्पवयीन मुलांनी गोळीबार केला.
बाल सुधारगृहात असताना त्यांच्यात वाद झाला होता. त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान सराईत गुन्हेगार असलेल्या ओंकार लोहकरे याचा या गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत
एका सराईत गुन्हेगारावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. आरोपींनी दोन राऊंड फायर केले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.