Pune Crime News | हॉटेलमध्ये नेऊन गुंगीचे औषध देत मुलीवर बलात्कार, पुण्यातील घटना; जळगाव येथील तरुणाला अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24  – Pune Crime News | मैत्रिणीला भेटण्यासाठी बोलावून घेत तिला गोड बोलून हॉटेलमध्ये नेले. त्याठिकाणी तिला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार (Pune Rape Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 21 डिसेंबर 2022 मध्ये पुणे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. याप्रकरणी जळगाव येथील तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत भोर तालुक्यातील कुरुंगवाडी येथील 22 वर्षाच्या तरुणीने सोमवारी (दि.30) डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहीलखाँ नन्हेखाँ पठाण Sahil Khan Nanhe Khan Pathan (वय-27 रा. अमंळनेर स्टेशन रोड, राम चौक, जळगाव) याच्यावर आयपीसी 376, 328, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित तरुणीचा मित्र आहे. आरोपीने तरुणीला एनसीसी मुख्यालय
गेटवर भेटण्यासाठी बोलावून घेतले. तरुणी आरोपीला भेटण्यासाठी आली असता त्याने तिला गोड बोलून रिक्षातून पुणे स्टेशन
परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. त्याठिकाणी तिला शितपेयातून गुंगीकारक औषध दिले.
तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. तसेच संबंध ठेवतानाचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढले. याबाबत कोणाला काही सांगितले तर अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.