Pune Crime News | रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 15 लाखांची फसवणूक, लोहगाव येथील महिलेवर FIR

0
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन –  Pune Crime News | रेल्वेत नोकरी (Railway Job) लावण्याच्या नावाखाली 15 लाख रुपये घेऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोहगाव येथील एका महिलेवर विमानतळ पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे 2019 ते मे 2020 दरम्यान लोहगाव येथील इंद्रायणी विहार संतनगर येथे घडली आहे. (Pune Crime News)याबाबत मोहन सिद्राम व्हटकर (वय-49 रा. अशोका पार्क सोसायटी, मांजरी बु.,पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अंकिता सुभाष कांबळे (वय-27 रा. इंद्रायणी विहार संतनगर, लोहगाव) हिच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोन मुलांना रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष आरोपी महिला अंकिता कांबळे हिने दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन मुलांना नोकरी लावण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार व्हटकर यांनी दोन्ही मुलांना रेल्वेत नोकरी लावण्यासाठी अंकिता कांबळे हिला तिच्या घरी जाऊन 15 लाख रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपी महिलेने नोकरी न लावता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. (Pune Crime News)तसेच अंकिता कांबळे हिने मकरध्वज चव्हाण यांच्याकडून 7 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी मोहन व्हटकर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात अर्जाद्वारे तक्रार केली होती. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी अंकिता कांबळे हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळवी (PSI Salvi) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.