Ajit Pawar-Sanjog Waghere | ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे थेट अजितदादांच्या पाया पडले, लग्न सोहळ्यात झाली भेट, पण दादांनी आशीर्वाद दिला का?

0

पिंपरी-चिंचवड : Ajit Pawar-Sanjog Waghere | अजित पवार यांचे पूर्वीचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी नंतर शिवसेना ठाकरे गटात (Shivsena UBT) प्रवेश केला. सध्या ते मविआचे (Mahavikas Aghadi) मावळ लोकसभेचे उमेदवार (Maval Lok Sabha) असून महायुतीच्या (Mahayuti) श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्याशी त्यांचा सामना होत आहे. काल आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या कन्येच्या लग्नात अजित पवार आले होते, त्याचवेळी वाघेरे देखील आले. दादा स्टेजवर उभे असल्याचे पाहताच वाघेरे यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. या प्रसंगाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

समोरा-समोर आल्यानंतर संजोग वाघेरे हे अजित पवारांच्या पाया पडले, पण यावेळी अजित पवार काही वेळ अवघडल्याचे दिसून आले. हे दोघे पिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळ्यास काल रात्री उशिरा एकत्र आले होते. वाघेरे यांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला असला तरी अजित पवार यांनी वाघेरे यांच्यासोबत लग्न समारंभात जेवण करत असताना प्रत्यक्ष बोलणे टाळल्याचे दिसून आले.

या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना संजोग वाघेरे म्हणाले, महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. आणि हीच महाराष्ट्रातील खेळी – मेळीच राजकीय संस्कृती जपण्यासाठी मी अजित पवार यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. यात वावगं काही नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.